हैडलाइन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार

बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्या जिल्हा संघटकांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वितरण उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

दरम्यान खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस डॉ. चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त जनार्दन शेळके, अर्जून पुरस्कार प्राप्त सुरेखा कुलकर्णी, श्रीरंग इनामदार उपस्थित होते. 


बदलत्या युगामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज बनली असून लॅपटॉपमुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. स्वर्गीय अजितदादांनी खो खो खेळाच्या चौफेर प्रगतीसाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्याच संकल्पनेतून पेपरलेस कामकाजासाठी लॅपटॉप वितरण होत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची व प्रतिष्ठित खो-खो स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र खो - खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा बारामती येथे होणार असून स्पर्धेच्या अनुषंगाने असोसिएशनने तयारीला सुरुवात करावी,असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

यावेळी असोसिएशन अंतर्गत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव,धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे येथील सचिवांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

‘मेरी धारावी, मेरे...

स्वतंत्रता दिवस के मौके पर धारावी के 40 से ज्यादा स्कूलों के 1,000 से अधिक...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

बुलढाणा जिल्ह्यातील...

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी...