काठमांडू येथे अडचणीत असलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परतण्यासाठी मदत करण्यात आली आहे.
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या वतीने राहुल कनाल यांनी काठमांडू येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित नागरिकांना आवश्यक मदत केली.
काठमांडू ते गोरखपूर असा रस्तेमार्गे प्रवास, तसेच त्यानंतरच्या पुढील विमान प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परतण्यास मोठा दिलासा मिळाला.
या मदतीबद्दल संबंधित भारतीय नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.