वाशी विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागात बोकाळलेल्या भ्रस्टाचारला आळा घालण्याच्या उद्देशाने कामगार नेते प्रदीप वाघमारे यांनी अमरण उपोषन आंदोलनाची घोषणा केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून वाशीतील मार्जिनल स्पेस मोकळे करून घेण्यात यावेत या मागणीसाठी प्रदीप वाघमारे नवी मुंबई महानगर पालिकेच्या महापौर मॅडम,उपमाहापौर साहेब, आयुक्त साहेब तसेच प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहेत. परंतु आज तागायत वाघमारे यांच्या निवेदनाला कोणीही गांभीर्याने घेतलेले नाही.
वाशीतील सेक्टर 9,10,15,आणि 17 येथील धनदांडगे व्यापारी अनेक वर्षा पासून मार्जिनल स्पेशचा सर्रास अनधिकृतपणे गैर वापर करीत आहेत.वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणूनही व्यापाऱ्यांवर कुठलीच करवाई होत नाही. परंतु हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब फेरीवाल्यांवर मात्र प्रतिदिन अतिक्रमण विभागा कडून फोजफाट्यासह कठोर कारवाई केली जाते. कित्येक व्यापाऱ्यांनी आपल्या शॉप समोरील मार्जिनल स्पेस काबीज केले असून सर्रास अनधिकृतपणे दुकानें वाढवली आहेत, काहींनी तर मार्जिनल स्पेस इतर व्यवसाईकांना भाडे तत्वावर दिली आहेत. काही व्यापाऱ्यांनी एवाढाव्य विक्रीचे सामान दुकानाच्या बाहेर ठेवून विक्री करत आहेत. असे असताना कारवाई फक्त गोरगरीब फेरीवाल्या गोर गरीब घटकावरच का केली का केली जाते असा प्रश्न उपस्थिती केला आहे.
मार्जिनल स्पेसच्या संदर्भात पालिका प्रशासनाला जाब विचारून मार्जिनल स्पेस मोकळे करून घ्यावेत म्हणुन वारंवार निवेदणाद्वारे मागणी केली आहे. परंतु वाघमारे यांच्या निवेदनाचा प्रशासने कसलाही विचार न करता व्यापाऱ्यांना मूक संमती दिली आहे असे दिसते आहे. वाशीतील मार्जिनल स्पेस मोकळे करून घ्यावेत या मागणीसाठी वाघमारे यांनी गत 12 मार्च 2026 रोजी वाशी विभाग कार्यालयच्या समोर अमरण उपोषण केले होते. पालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रण विभागाचे तत्कालीन सहा. आयुक्त अरुण पाटील यांच्या उपस्थितीत मला लेखी पत्र देऊन पुढील आठ दिवसात मार्जिनल स्पेस मोकळे करून घेऊ असे आश्वसन दिले होते.
परंतु पालिका प्रशासनाने आपला शब्द न पाळता माझी फसवणूक केली आहे असा आरोप वाघमारे यांनी केला आहे. वाशी विभाग कार्यालयातील विभाग अधिकारी सुखदेव येडावे हे अतिक्रमण अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असून मनमानी करत आहेत.सहा. आयुक्त सुखदेव येडवे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशही पाळत नसल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.
म्हणुन वाशी विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागातील बोकाळलेल्या भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी आणि मार्जिनल स्पेस मोकळे करून घेण्यासाठी कामगार नेते प्रदीप वाघमारे यांनी सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी वाशी विभाग कार्यालयाचे मुख्य प्रवेश द्वारावर अमरण उपोषण करण्याचे घोषित केले आहे. जो पर्यंत मार्जिनल स्पेस मोकळे करून घेण्यात येणार नाहीत आणि अतिक्रमण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या ठिकाणाहून बदल्या केल्या जाणार नाहीत तो पर्यंत अमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असे प्रदीप वाघमारे यांनी जाहीर केले आहे.