हैडलाइन

लोकनेते आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कै. विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे येथील दहीहंडी उत्सव संपन्न

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच दहीहंडी फोडली जाते ही परंपरा राखत यंदा ही बाळ गोपाळ गोविंदा पथकास संधी देत मानाची दहीहंडी फोडण्यात आली. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून या गोविंदा पथकास गौरवण्यात आले .

महाराष्ट्र राज्य वनमंत्री माननीय आमदार लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला .याप्रसंगी मान्यवर नवी मुंबई महापौर सुजाताताई पाटील मंडळाच्या सल्लागार स्थानिक नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


लोककला सादर करीत मनोरंजनाच्या कार्यक्रमासकट स्थानिक कला प्रेमींना मुक्त व्यासपीठ मंडळांनी उपलब्ध करून देत प्रोत्साहनात्मक बक्षीस दिली, उपस्थित महिला व पुरुष यांना लकी ड्रॉ द्वारे मोबाईल भेट मिळाली तसेच वय वर्ष 15 खालील मुलीला सायकल लकी ड्रॉ च्या माध्यमातून प्राप्त झाले आणि राधा व कृष्ण वेशभूषा करून आलेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनात्मक बक्षीसे प्रदान करण्यात आली.

आपली सांस्कृति परंपरा जतन करीत मंडळांनी 2026 ची दहीहंडी भव्य दिव्य स्वरूपात साकार करण्यामागे अनेक थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व या दहीहंडी उत्सवाचे आयोजक जयेंद्र अरुण सुतार यांनी सांगितले.

 नवी मुंबई शहर परिसरातील अनेक मान्यवर तथा नगरसेवक यांनी या दहीहंडी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली माननीय नगरसेवक निशांत भगत, सुरेश शेट्टी, गिरीश म्हात्रे,  विशाल विचारे, नगरसेविका मीरा पाटील, संतोषी गणेश म्हात्रे, प्रीती भोपी, रूपाली भगत, वैभवी नाईक, ललिता मडवी, सपना गावडे, माजी नगरसेवक घनश्याम मडवी, गणेश म्हात्रे, शिल्पाताई कांबळी, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष राजेश राय समवेत प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नरेश सुतार, प्रभाकर ठाकूर, संजय झणझणे ,कमलाकर सुतार ,हरिभाऊ सुतार, जयराम धुमाळ, किशोर पवार , मोहन कदम , पांडुरंग सुतार , दिलीप घरत ,विनायक भोईर, हौसाराम पाटील, ज्ञानदेव घरत, अरविंद पाटील नामदेव ठाकूर, दत्ता पाटील, जयेश भावसार आणि महिला पदाधिकारी कुमुद पाटील, बारकी सुतार, अरुणाताई भोईर ,वर्षा पवार ,अनिता पाटील ,जयश्री सुतार, मीना पंडित सुतार, नयना सुतार, उज्वला सुतार, बेबी सुतार ,भावना भोईर समवेत इतर महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनियोजित शिस्तबद्ध कार्यक्रम च्या आयोजनाबाबत उपस्थित सर्व नागरिकांनी कै.विनोद सारिका स्मृति कला क्रीडा मंडळाचे कौतुक करीत या उत्सवात सहभागी होत आनंद व्यक्त केला.


Most Popular News of this Week

शेतकरी अस्मानी व सुलतानी...

मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ...

भारत–श्रीलंका वार्षिक...

भारत और श्रीलंका के बीच द्विपक्षीय समुद्री अभ्यास SLINEX-26 का 13वां संस्करण 17 से 21...

शेतकऱ्यांनी विविध शासकीय...

कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत...

शिवसेना मुख्य नेते,...

शिवसेनेच्या मुख्य धारे सोबत पर्यावरण संवर्धन जतन,जनजागृती आणि व्यवस्थापन...

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी)...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे...

गणेशोत्सवाच्या...

श्रीगणेशोत्सवाच्या काळात मुंबईत नियमित प्रवाशांसोबतच भाविक आणि...