हैडलाइन

कृत्रिम तलावामुळे भांडुपमध्ये गणरायांचे विसर्जन सुलभ

काल वाजतगाजत गणरायांचे आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना पर्यावरणाला होणारी हानी आणि वाढते जलप्रदूषण लक्षात घेता कृत्रिम तलाव हा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही भांडुप पश्चिम स्टेशन रोड, गीता हॉलजवळ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील भाविकांना आपल्या गणरायाच्या मूर्तीचे जवळच आणि सुलभपणे विसर्जन करता आले.

दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी सायंकाळपासून या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत भाविकांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. घराजवळच विसर्जनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह गणेशभक्तांची मोठी सोय झाली. या उपक्रमाबद्दल स्थानिक भाविकांनी खासदार संजय दिना पाटील आणि नगरसेविका राजोल संजय पाटील यांचे आभार मानले. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने पारंपरिक विसर्जनस्थळांवर मोठी गर्दी होते. त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, सजावटीचे साहित्य आणि निर्माल्य यामुळे जलस्रोतांवर पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता असते. वाढते प्रदूषण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची संकल्पना महत्त्वाची ठरत आहे. नैसर्गिक तलाव, नदी किंवा समुद्रात थेट विसर्जन करण्याऐवजी नागरिकांनी उपलब्ध असलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करावा, यासाठीही प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून जनजागृती केली जात आहे.


मुंबई महानगरपालिकेने यंदा शहरातील विविध भागांत दीड दिवसांसह अन्य गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत ३८३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, काही ठिकाणी विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक विसर्जनस्थळांवरील गर्दी कमी होण्यास मदत होत असून, नागरिकांना आपल्या परिसरातच गणरायाला निरोप देण्याची सुविधा मिळत आहे.

भांडुप पश्चिम स्टेशन रोड, गीता हॉलजवळ खासदार संजय दिना पाटील आणि नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाला परिसरातील भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. आसपासच्या भागातील अनेक कुटुंबांनी या तलावात दीड दिवसांच्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले. गणरायाच्या विसर्जनासाठी दूरवर जाण्याची गरज नसल्याने भाविकांचा वेळ आणि श्रमही वाचले. पर्यावरणाचे संरक्षण करत गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय भविष्यात आणखी व्यापक करण्याची गरज असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. धार्मिक भावना जपत पर्यावरणाचीही काळजी घेण्याचा संदेश या उपक्रमातून मिळत असून, गणेशभक्तांनीही पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्याला प्राधान्य द्यावे, तसेच वसुंधरेला वाचविण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर जास्तीत जास्त करण्यात यावा,  असे आवाहन राजोल पाटील यांनी केले.


Most Popular News of this Week

मंत्री आशिष शेलार यांनी...

उद्योगपती आणि समाजसेवक, सिंधी समाजाचे नेते किशोर मन्याल यांच्या खार येथील...

शाळकरी मुलांच्या...

नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पर्यावरण व वातावरणीय...

खोपोली में 30 अक्टूबर से ‘द...

भारत की शिक्षा व्यवस्था को नई दिशा देने के उद्देश्य से खोपोली में ‘द...

सर्वांच्या सामूहिक...

पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात....

आर्य समाज चेंबूर में संपन्न...

मुंबई के चेंबूर में आर्य समाज द्वारा आयोजित भव्य शताब्दी समारोह...

कोकणातील निसर्ग व...

कोकणातील निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल...