हैडलाइन

एमआयडीसीतील कंपन्यांची संयुक्त तपासणी ; सागरी सीमा आणि परप्रांतीय कामगारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली असून, गेल्या वर्षभरात तस्करांवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ६४ गुन्हे नोंदवून तब्बल ९२ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये ब्राऊन हेरॉईन, हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी असा एकूण १४ लाख २८ हजार ६४ रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.


   जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 'नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या' (एनकॉर्ड) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


अंमली पदार्थांचे उच्चाटन हा केंद्र व राज्य शासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचे स्पष्ट करत श्री. महामुनी म्हणाले, "वर्षभरातील कारवाई समाधानकारक असली, तरी आता या मोहिमेला अधिक गती देणे गरजेचे आहे. एमआयडीसी परिसरातील संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच बंद कारखाने यावर पोलीस आणि एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून कंपन्यांची कसून तपासणी करावी.  रत्नागिरीच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा गैरवापर रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने अत्यंत दक्ष राहावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींची नियमित तपासणी करण्यात यावी, विशेषतः या बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी व इतर परप्रांतीय कामगारांच्या पार्श्वभूमीची आणि त्यांची बारकाईने पडताळणी करावी, असे निर्देशही श्री महामुनी यांनी दिले.  पोलीस दलाने ग्रामसभांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्हेगारीविरोधात जिल्ह्यात प्रभावी जनजागृती केली आहे. शिक्षण विभागानेही यात उत्तम भूमिका बजावली असून, आता सर्वच शासकीय यंत्रणांनी ही लढाई स्वतःची मानून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.


Most Popular News of this Week

खारघर में CISF की ओर से 10 किलोमीटर...

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) की मुंबई एयरपोर्ट यूनिट की ओर से शनिवार...

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण...

देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. विद्यार्थ्यांचा...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि...

विद्याविहार रेल्वे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेल्या तीन...

धुळे, नंदुरबार आणि जळगाव...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी...

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित जनता...