हैडलाइन

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाधारित अभिनव उपक्रम

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये आता तंत्रज्ञानाची भर पडली आहे. अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. यासाठी महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून माहीम येथील गजानन वाटीका परिसरात एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्याद्वारे कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल टिपून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.


महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याच अनुषंगाने, उप आयुक्त (परिमंडळ-२) . प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) . योगेश देसाई यांच्या पुढाकाराने हा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येत आहे.


माहीम येथील गजानन वाटीका परिसरात असलेल्या मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्यासोबत ध्वनीक्षेपक जोडण्यात आले आहेत. कचरा टाकण्यासाठी येथे येणाऱ्या व्यक्तीची हालचाल कॅमेऱ्यात टिपली जाते. त्यानंतर तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच उघड्यावर कचरा न टाकण्याच्‍या आवाहनाची उद्घोषणा होते. या प्रयोगामुळे कचरा टाकणारी व्यक्ती परावृत्त होऊन संबंधित ठिकाणी कचरा टाकणार नाही आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता होत नाही. एकंदरितच, नागरिकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविणे आणि कचरा असुरक्षित ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये, हा या प्रयोगामागील प्रमुख उद्देश आहे. 


Most Popular News of this Week

खारघर में CISF की ओर से 10 किलोमीटर...

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) की मुंबई एयरपोर्ट यूनिट की ओर से शनिवार...

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण...

देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. विद्यार्थ्यांचा...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि...

विद्याविहार रेल्वे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेल्या तीन...

धुळे, नंदुरबार आणि जळगाव...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी...

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित जनता...