मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित जनता दरबारात आज उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले.
यावेळी नागरिकांच्या अपेक्षा आणि भावना समजून घेत त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक व प्रभावी तोडगा काढण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले.
नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.