आमदार गोपीचंद पडळकर यांची चेंबूर भाजप कार्यालयात सदिच्छा भेट
मुंबई: महाराष्ट्रात घोंगडी बैठकी निमित्त पायपीट करणारे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर अशाच एका चेंबूर, घाटला विभागातील घोंगडी बैठकी नंतर चेंबूर भाजपा प्रभाग क्र. १५२ च्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले.
या प्रसंगी चेंबूर भाजप मंडळ अध्यक्ष राहुल वाळंज, जिल्हा महामंत्री विलास आंबेकर, नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन पडळकर यांचे स्वागत केले.
या वेळी मंडळ महामंत्री गुरुदास पै, महामंत्री राजाराम उपाध्यय, वार्ड अध्यक्ष अनिकेत चव्हाण, पडळकर यांचे निकटवर्तीय संतोष भानुसे यांच्या सोबत स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.