कोरोनातील दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना पी.एम. केअर प्रमाणपत्राचे वाटप: मुंबई उपनगर जिल्ह्यातील 17 बालकांचा समावेश

कोरोनातील दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना पी.एम. केअर प्रमाणपत्राचे वाटप



मुंबई उपनगर जिल्ह्यातील 17 बालकांचा समावेश


 

            मुंबईदि. 30 : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना "पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन" या योजनेंतर्गत मिळणारे सर्व लाभ देण्यासाठी सोमवार दि. 30 रोजी केंद्र सरकारच्या वतीने देशभर ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्हा सहभागी झाला.  मुंबई उपनगर जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 17 बालकांना प्रत्येकी 10 लाख रु. डिपॉझीट केलेले त्यांच्या नावाचे पासबुक, PM JAY हेल्थ कार्डपंतप्रधानाचे मुलांना पत्र आणि मुलाचे पी. एम. केअर प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात आले.

            जिल्हाधिकारी कार्यालयबांद्रामुंबई उपनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टीखासदार मनोज कोटकजिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीसह बालकल्याण समिती व बालन्यायमंडळाचे सदस्य माणिक शिंदेसिमा अदातेजयश्री लोंढेअनाथ बालकांसह त्यांचा सांभाळ करणारे नातेवाईक उपस्थित होते. जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या प्रमुख श्रीमती देसाई आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. नागरगोजे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.



Most Popular News of this Week