हैडलाइन

अखिल भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रशिक्षण शिबिर आयोजित

अखिल भारतीय मराठा महासंघ  पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रशिक्षण शिबिर आयोजित 



ग्लोबल चक्र न्यूज़ डेस्क 

मुंबई: अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रशिक्षण शिबिर  सायन येथील पद्मभूषण वसंत दादा पाटील प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय व शैक्षणिक संकुल,मुंबई येथे आयोजित करण्यात आले.या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषेदेचे गटनेते आमदार  प्रवीण दरेकर हे उपस्थित होते। 

 
या शिबिरात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संघटना बांधणी, संघटनेचे महत्व, आत्मसात करण्यासाठी पदाधिकारी यांना कानमंत्र दिले। समाज बांधवांच्या अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मोलाचे मार्गदर्शन केले व मराठा समाजाला सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच या मेळाव्यामध्ये मराठा समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या मागण्या मान्य करून त्याची पूर्तता करण्याचे मान्य केले. या मेळाव्यास राष्ट्रीय सल्लागार व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख , राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रमोदराव जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा भरतीताई पाटील, रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई चिटणीस रक्षाताई घोसाळकर, मुंबई बँक संचालिका कविताताई  देशमुख, पद्मभूषण वसंत दादा पाटील प्रतिष्ठान चे अध्यक्ष नंदकुमार काटकर , सरचिटणीस ऍड. आप्पासाहेब देसाई, उद्योजक  अभिजित घाग, विभागीय संघटक प्रवीण पवार, मुंबई अध्यक्ष नरेश मोरे, मुंबई उपाध्यक्ष  शंकर मोहिते,  प्रसाद सावंत, मुंबई सरचिटणीस शामराव मोहीते-पाटील,  रामचंद्र भिलारे, ऍड. धर्मराज जाधव हे मान्यवर उपस्थित होते.


 मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्याचे सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या सह तालुका पदाधिकारी व शाखा पदाधिकारी यांनी सभागृह यांनी राजेंद्र कोंढरे यांच्या नेतृत्वाला सलाम करून त्यांनी दिलेला कानमंत्र आत्मसात करून अखिल भारतीय मराठा महासंघ घराघरात पोहचविण्याचा निश्चय केला. 

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, सरचिटणीस सुधीर पाटिल यांनी केले होते. दक्षिण-मध्य मुंबईतील सर्व तालुका, शाखा पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य केले.

या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे दक्षिण-मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने सचिन शिंदे व  सरचिटणीस सुधीर पाटिल यांनी आभार व्यक्त केला. 



Most Popular News of this Week

राहुल शेवाळे यांना प्रभू...

राहुल शेवाळे यांना प्रभू श्रीरामाचा आयोध्येतून खास आशीर्वादअयोध्येतील...

मुकेश अंबानी ने श्री...

मुकेश अंबानी ने श्री सिद्धिविनायक बाप्पा का लिया दर्शन●कपिलदेव...

राहुल शेवाळे यांनी घेतली राज...

राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेटशिवतीर्थ निवासस्थानी...

दुर्गा माता मंदिर कुर्ला में...

दुर्गा माता मंदिर कुर्ला में नवरात्रि उत्सव सम्पन्न मुंबई: विगत 30 वर्षों...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों तक मुफ्त राशन, गैस कनेक्‍शन और PM सूर्य घर से...

बीजेपी से निलंबित पूर्व...

बीजेपी से निलंबित पूर्व नगरसेविका ठाकरे गुट की शिवसेना में शामिलपनवेल।...