हैडलाइन

यामिनी जाधव यांची सभापतीपदी वर्णी, अजय पाटील उपसभापती — बिनविरोध निवड

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) सभापती, उपसभापती आणि स्थापत्य समिती (उपनगरे) सभापती, उपसभापती पदासाठीची निवडणूक महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. शहर आणि उपनगरे येथील स्थापत्य समितीकरिता सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.


स्थापत्य समिती (शहर) सभापती पदासाठी शिवसेना पक्षाच्या यामिनी यशवंत जाधव यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्थापत्य समिती (शहर) उप सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे अजय किसन पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


यासोबतच, स्थापत्य समिती (उपनगरे) सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती संगीता शर्मा यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्थापत्य समिती (उपनगरे) उप सभापती पदासाठी शिवसेना पक्षाचे सुरेश आवळे यांचे एकमेव नामनिर्देशन आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य समिती (शहर) आणि स्थापत्य समिती (उपनगरे) यांच्या सदस्यांसह प्रमुख अभियंता (पर्यावरण व वातावरणीय बदल) प्रदीप गवळी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.



Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...