स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त 'अजित स्मृती अवीट स्मृती'छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत पार पडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सतीश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
महिला विकास मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या छायाचित्र प्रदर्शनात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील विविध टप्प्यांची साक्ष देणार्या दुर्मिळ छायाचित्रांचे विशेष संस्मरणीय प्रदर्शन गोकुळ दुध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि युवक प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांनी आयोजित केले होते.