भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेत भक्तीभावाने आरती केली.
यावेळी त्यांचे शिंदे कुटुंबियांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने अतिशय हृद्य स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय महासचिव (संघटन) श्री शिव प्रकाश, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.