पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूर नाका येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी चेंबूर आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या चेंबूर विभागातर्फे आणि तेरापंथ युवक परिषदेचे स्थानिक अध्यक्ष यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कामा आणि आल्बेस रुग्णालयाच्या सहकार्याने हा रक्तदानाचा उपक्रम पूर्ण झाला.
गेल्या कित्येक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त याच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदाही नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ मानले जाते. रक्तदान करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ लागतो, मात्र एखाद्या गरजू रुग्णासाठी हेच रक्त अनमोल ठरू शकते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमातून रक्तदानाचा संदेश देण्यात आला.