हैडलाइन

मोदी सरकार विरोधात शिवाजी पार्कवर तरुणाईचा प्रचंड असंतोष, सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच खोटे गुन्हे दाखल- हर्षवर्धन सपकाळ

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनात या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे, परंतु भाजपाच्या मोदी सरकार विरोधातील हा असंतोष दडपण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुणाई आता मागे हटणार नाही, हे भाजपा सरकारने लक्षात ठेवावे, असा खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आहे, ती वाचवण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे देशासमोरील ज्वलंत प्रश्न आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी जी पत्रे पाठविले आहेत, त्यावर ज्ञानेशकुमार का बोलत नाहीत, यावर भाजपाने बोलावे, मुळ मुद्द्याला बगल देत नेहमीचेच हिंदु-मुस्लीम, भारत-पाकिस्तानचे तुणतुणे वाजवणे बंद करा. सरकार दडपशाही करून आवाज दडपण्याचा प्रयत्न करेल तर त्याची मोठी किंमत भाजपाला सरकारलाच मोजावी लागेल, असेही सपकाळ म्हणाले. 


शिवाजी पार्कवरील आंदोलनाबरोबरच नाशिकपासून मुंबईकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च निघाला आहे तर पुण्यात MPSC विरोधात लाखो तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या तिन्ही घटना भाजपा सरकारच्या गलथान कारभाराचे वाभोडे काढणाऱ्या आहेत. MPSC च्या अध्यक्षांची हकालपट्टी करावी ही विद्यार्थ्यांची मागणी असताना मुख्यमंत्री मात्र हात झटकत आहेत कारण या पदावरील अध्यक्ष भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यासारखे वागावे, तो मी नव्हेच असा पवित्रा घेऊ नये असे सपकाळ म्हणाले.

राज्यातील दुष्काळी दौऱ्याच्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येत आहे असे समजते, राज्यात मोठा दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येताना शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज घेऊन येतील व शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत देतील, अशी अपेक्षा करुया असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीवरून मविआत कोणतीही नाराजी नाही. ५ जागांपैकी २ ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. अमरावतीत काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे, इतर दोन जागांवर चर्चा सुरु आहे. ही निवडणूक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची आहे, आम्ही एकच असून आमच्या भूमिका परस्पर पूरक असतील, कोणताही तिढा नाही, समन्वय व्यापक करण्यासाठी बैठक होत आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले आहे.

जातीय छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या IIT बॅाम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शांता आश्रम येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, यु.बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के आदी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

खारघर में CISF की ओर से 10 किलोमीटर...

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) की मुंबई एयरपोर्ट यूनिट की ओर से शनिवार...

SINGAPORE–INDIA MARITIME BILATERAL EXERCISE (SIMBEX-2026) CONCLUDES

The 33rd edition of the Singapore–India Maritime Bilateral Exercise (SIMBEX-2026), hosted by the Indian Navy at Visakhapatnam, concluded on 26 October 2026. The exercise further strengthened the...

टीवी प्रोजेक्ट्स मशहूर...

आहट, सीआईडी, एजेंट विनोद , वो रात होने को है, गुटर गू, दिव्य दृष्टि, अदालत और...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

. अनेकांनी ट्रेनमधून उतरून...

मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने...

महानगरपालिका शाळांतील पाच...

पर्यावरण संवर्धन, स्वच्छ हवा आणि वातावरणीय बदल यांसारख्या महत्त्वाच्या...