हैडलाइन

ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा,"गर्जना" मोर्च्यात सामील होण्यासाठी जनजागृती

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नवी मुंबईतील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांना उद्या होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चात सहभागी होण्यासाठी जनजागृती केली.

यावेळी "ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा", "राजीनामा द्या ज्ञानेश कुमार राजीनामा द्या", "वोटचोर वोटचोर, मोदी सरकार वोटचोर" ह्या घोषणा देत मोर्च्यात सामील होण्याची पत्रके वाटण्यात आली त्याला नवी मुंबईकरांनीही सकारात्मक प्रतिसाद देत “लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आम्ही नक्की सहभागी होणार” अशी भावना व्यक्त केली.

या जनजागृती मोहिमेत मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, मनसे उपशहरअध्यक्ष निलेश बाणखेले, मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, नगरसेवक अभिजित देसाई, विशाल ससाणे, मनसे चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रंजनाताई शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, समीर बागवान, महेश कोठिवले, महिला मनसे उपशहर अध्यक्ष दिपाली ढऊळ, सोनिया धानके, यशोदा खेडस्कर, संगीता वंजारी, विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, श्याम ढमाले, सागर विचारे, अक्षय भोसले, दशरथ सुरवसे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ...

भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि...

मंत्री छगन भुजबळ व माजी...

सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी,...

विद्याविहार ईस्ट-वेस्ट...

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा नवनिर्मित विद्याविहार ईस्ट-वेस्ट कनेक्टर...

वडाला में कांग्रेस ने मनाया...

मुंबई के वडाला रेलवे स्टेशन के बाहर कांग्रेस की ओर से ‘लोकतंत्र का काला...

MLA सना मलिक शेख की पहल पर भव्य...

युवाओं के रोजगार और बेहतर भविष्य को ध्यान में रखते हुए, MLA सना मलिक शेख की ओर...