हैडलाइन

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांची महापौर रितू तावडे यांनी घेतली भेट; मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन


राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक बाह्यस्रोत (Outsourced) आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याची ग्वाही देत सर्व मागण्यांचा सकारात्मक पाठपुरावा करून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी नगरसेवक रोहिदास लोखंडे उपस्थित होते.

दरम्यान, या बाह्यस्रोत कर्मचाऱयांच्या मागण्यांसंदर्भात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना सविस्तर पत्र पाठवून योग्य ते निर्णय लवकरात लवकर घेण्याचे निर्देश दिले आहेत.


या पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ च्या संकटात या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुंबईकरांची सेवा केली आहे. ज्या अनुभवी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत १० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना सेवेत नियमित / कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी एकवेळ धोरण (One-Time Policy) आखून, त्यांना रिक्त असणाऱ्या पदांवर सामावून घेण्याबाबतचा सर्वंकष प्रस्ताव तयार करावा. त्यास महानगरपालिका व राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावे. त्याचप्रमाणे प्रशासकीय पातळीवर तयार असलेल्या प्रस्तावांना गती द्यावी. सुधारित किमान वेतन लागू करून थेट वेतनवाढीचा लाभ देणे, महिला कर्मचाऱ्यांना हक्काची भरपगारी प्रसूती रजा मंजूर करणे, दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून निर्णय घेणे, भविष्य निर्वाह निधी (PF) व ईएसआयसी (ESIC) चे कायदेशीर लाभ विहित वेळेत मिळणे, वेतनात विलंब करणाऱ्या कंत्राटदार संस्थेला (मे. डी. एस. एंटरप्रायझेस) कडक समज देण्यात यावी आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांसाठी 'तक्रार निवारण समिती' कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देशही महापौरांकडून देण्यात आले आहेत.

आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, कोविड काळात या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कामकाज केले आहे. त्यांच्या योगदानाची जाणीव महानगरपालिकेला आहे. या कर्मचा़रंयाच्या मागण्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष निकाली निघाव्यात, यासाठी मी स्वतः शासन आणि महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे, असे महापौरांनी नमूद केले.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

भाजपचे मंत्री रमाकांत गुप्ता...

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान’...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...