हैडलाइन

ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा,"गर्जना" मोर्च्यात सामील होण्यासाठी जनजागृती

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नवी मुंबईतील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांना उद्या होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चात सहभागी होण्यासाठी जनजागृती केली.

यावेळी "ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा", "राजीनामा द्या ज्ञानेश कुमार राजीनामा द्या", "वोटचोर वोटचोर, मोदी सरकार वोटचोर" ह्या घोषणा देत मोर्च्यात सामील होण्याची पत्रके वाटण्यात आली त्याला नवी मुंबईकरांनीही सकारात्मक प्रतिसाद देत “लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आम्ही नक्की सहभागी होणार” अशी भावना व्यक्त केली.

या जनजागृती मोहिमेत मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, मनसे उपशहरअध्यक्ष निलेश बाणखेले, मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, नगरसेवक अभिजित देसाई, विशाल ससाणे, मनसे चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रंजनाताई शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, समीर बागवान, महेश कोठिवले, महिला मनसे उपशहर अध्यक्ष दिपाली ढऊळ, सोनिया धानके, यशोदा खेडस्कर, संगीता वंजारी, विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, श्याम ढमाले, सागर विचारे, अक्षय भोसले, दशरथ सुरवसे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

गुर्जरगौड़ ब्राह्मण समाज का...

मुंबई। गुर्जरगौड़ ब्राह्मण हितैषिणी सभा (रजि.), मुंबई द्वारा आयोजित दिवाली...

सायन-कोलीवाड़ा में शाइना एनसी...

मुंबई के सायन-कोलीवाड़ा में शिवसेना UBT की ओर से शाइना एनसी के खिलाफ ‘चप्पल...

लातूर जिल्हा बँकेत सहकार...

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी...

लोकनेते अजितदादांचा...

 मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दादांची अपूर्ण स्वप्ने, त्यांचे...

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित,...

 राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात...

क्रांतिकारक बिरसा मुंडा...

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका...