हैडलाइन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, चारा आणि पशुधनाचे नियोजन युद्धपातळीवर करा - आमदार पंकज भुजबळ

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी आणि दूरदृष्टीने नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच जनावरांसाठी चारा व पाणी, पशुधनाची अचूक नोंदणी आणि कृषी क्षेत्रातील अडचणींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात,अशा स्पष्ट सूचना आमदार पंकज भुजबळ यांनी दिल्या.

येवला संपर्क कार्यालयात आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पिण्याचे पाणी, संभाव्य पाणीटंचाई, चाऱ्याची उपलब्धता, जनावरांची नोंदणी, पशुसंवर्धन विभागाची तयारी, कृषी क्षेत्राची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना आवश्यक मदत याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हिमांशू चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मोहन शेलार, बाळासाहेब गुंड, रतन बोरनारे, नवनाथ काळे, सुनील पैठणकर, निसार शेख, नवनाथ थोरात यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी येवला मतदारसंघातील गावनिहाय पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई याची माहिती घेऊन टंचाईग्रस्त आणि टंचाईची शक्यता असलेल्या गावांचे पूर्वनियोजन करण्याच्या सूचना आमदार पंकज भुजबळ यांनी दिल्या. विहिरी, बोअरवेल, पाणीपुरवठा योजना आणि इतर उपलब्ध जलस्रोतांची सद्यस्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था वेळेत करावी. ज्या ठिकाणी भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना सुरू कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.

दुष्काळी परिस्थितीत सर्वाधिक अडचण पशुपालकांना निर्माण होऊ शकते. त्यामुळे तालुक्यातील पशुधनाची गावनिहाय अचूक नोंदणी करून उपलब्ध चारा आणि भविष्यातील चाऱ्याची गरज याचा ताळमेळ साधावा अशा सूचना देण्यात आल्या. आवश्यकतेनुसार चारा डेपो, चारा छावण्या तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था याबाबत पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश आमदार पंकज भुजबळ यांनी दिले.

पावसातील खंडाचा पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी, तसेच आवश्यक असल्यास सर्वेक्षण, पंचनामे आणि अहवाल शासनाकडे वेळेत सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या.

दुष्काळी परिस्थिती ही केवळ पाण्याची समस्या नसून त्याचा थेट परिणाम शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे पाणी, चारा, पशुधन आणि शेती या चारही आघाड्यांवर प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. येवला तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये आणि शेतकरी व पशुपालकांना आवश्यक मदत वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे असे आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितले.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

भाजपचे मंत्री रमाकांत गुप्ता...

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान’...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...