हैडलाइन

भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्‍या तातडीने मार्गी लावाव्‍यात

भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्‍या तातडीने मार्गी लावाव्‍यात. स्‍थानिक नागरिकांच्‍या मागणीचा विचार करून वायू प्रदूषण कमी करण्‍यासाठी महानगरपालिका निधीतून पर्यावरणपूरक धुराची उंच चिमणी उभारावी, असे निर्देश मुंबईच्‍या महापौर रितू तावडे यांनी दिले. स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक बाबींकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, असे निर्देश देखील महापौर तावडे यांनी दिले.


महापौर रितू तावडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्‍या पुढाकाराने एस आणि टी विभागातील विविध विषयांवरील बैठक आज (दिनांक १७ नोव्‍हेंबर २०२६) पार पडली. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) प्राजक्‍ता वर्मा लवंगारे, उप आयुक्‍त (उद्याने)  अजितकुमार आंबी, एस विभागाच्‍या सहायक आयुक्‍त समरीन सय्यद, टी विभागाच्‍या सहायक आयुक्‍त योगिता कोल्‍हे यांच्‍यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.


माजी खासदार मनोज कोटक म्‍हणाले की, भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्मशानभूमीसाठी संबंधित संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मौल्यवान जागा दानस्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा उपयोग नागरिकांच्या सोयीसाठी आणि सार्वजनिक हितासाठी होत आहे. या स्‍मशानभूमीच्‍या विकासासाठी महानगरपालिकेने २ कोटी ७० लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. तथापि, एका परिपत्रकाचा आधार घेऊन २ कोटी ७० लाख रूपयांच्‍या अंदाजपत्रकीय रकमेपैकी संबंधित संस्‍थेने एक तृतीयांश म्‍हणजेच ९० लाख रूपये खर्च करावेत, असे बजावले आहे. हे योग्‍य नाही. संबंधित संस्‍थेने विनामूल्‍य जागा उपलब्‍ध करून दिली असून त्‍याची जाणीव महानगरपालिका प्रशासनाने ठेवावी. कोविड काळात याच स्‍मशानभूमीत दहनविधी मोठ्या संख्‍येने झाले होते, याचीदेखील दखल घ्‍यावी. 


महापौर रितू तावडे म्‍हणाल्‍या की, सेवाभावी वृत्‍तीने आणि ना नफा ना तोटा तत्‍त्‍वावर संस्‍था कार्यरत आहे. स्‍थानिक नागरिकांच्या तक्रारींचे दखल घेऊन स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. अंदाजपत्रकीय रकमेपैकी संबंधित संस्‍थांनी एक तृतीयांश रक्‍कम भरावी, याबाबत जुलै २०२६ मध्‍ये निर्गमित केलेले परिपत्रक तातडीने रद्द करावे आणि सुधारित परिपत्रक जारी करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. सामाजिक दायित्‍व निधीतून (CSR FUND) टी विभागात मुलुंड पश्चिम येथे परमवीर चक्र उद्यान विकसित करण्‍यात आले आहे. त्‍याचे लोकार्पण लवकरात लवकर करावे. उद्यानाच्‍या देखभाल - दुरूस्‍तीसाठी काळजीवाहक (Caretaker) संस्‍थेची नेमणूक करावी. त्‍या माध्‍यमातून उद्यानाचे परिरक्षण, सुरक्षा व्‍यवस्‍था तैनात करावी, असेदेखील निर्देश महापौर तावडे यांनी दिले. 


Most Popular News of this Week

सायन-कोलीवाड़ा में शाइना एनसी...

मुंबई के सायन-कोलीवाड़ा में शिवसेना UBT की ओर से शाइना एनसी के खिलाफ ‘चप्पल...

भांडुप (पश्चिम) येथील गुजराती...

भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्‍या तातडीने...

शिवसेना प्रवक्त्यांकडून...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या सोनिया गांधी...

कांदिवली पश्चिम येथे १५...

पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई...

मुंबईतील समुद्र...

मुंबईच्या सागरी किनारपट्टीचे प्रदूषण कमी करून समुद्र स्वच्छ व...

तीन दिवसांत १३८ बांधकामे...

रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या...