हैडलाइन

मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी आपले एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त केले जमा

खासदार राहुल शेवाळे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा


राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेसाठी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द



मुंबई, ता. 16 : महाराष्ट्रातील मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी, खासदार राहुल शेवाळे यांनी आपले एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त जमा केले आहे. खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेऊन एक लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. 


देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या निर्णयानुसार केंद्राकडून महाराष्ट्राला कोरोना लसींचा साठा उपलब्ध होत आहे. मात्र, काही प्रमाणात राज्य सरकारला कोरोना लशींची खरेदी करणे अनिवार्य आहे. "केंद्र सरकारकडून कोरोना लसींचा साठा मोफत उपलब्ध होत असला तरीही राज्यातली जनतेचे मोफत लसीकरण वेगाने करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. यासाठी यंत्रणेवर मोठा खर्च करावा लागेल.तसेच राज्य सरकारला काही प्रमाणात लशींची खरेदी करणे अनिवार्य आहे. आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधी या नात्याने खारीचा वाटा उचलावा, या भावनेने माझे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त जमा करण्याचा निर्णय घेतला" अशी प्रतिक्रिया खासदार शेवाळे यांनी दिली आहे.


कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये इतर खासदारांप्रमाणे खासदार राहुल शेवाळे यांनाही आपला दोन वर्षांचा विकासनिधी 'पीएम केअर फंडा'साठी दिला होता. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अशाच रीतीने एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा केले होते.  केरळमधील महापूर, कोल्हापुरातील प्रलय  यावेळीही असाच पुढाकार खासदार शेवाळे यांच्या वतीने घेण्यात आला होता.



Most Popular News of this Week

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ...

भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि...

मंत्री छगन भुजबळ व माजी...

सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी,...

विद्याविहार ईस्ट-वेस्ट...

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा नवनिर्मित विद्याविहार ईस्ट-वेस्ट कनेक्टर...

वडाला में कांग्रेस ने मनाया...

मुंबई के वडाला रेलवे स्टेशन के बाहर कांग्रेस की ओर से ‘लोकतंत्र का काला...

MLA सना मलिक शेख की पहल पर भव्य...

युवाओं के रोजगार और बेहतर भविष्य को ध्यान में रखते हुए, MLA सना मलिक शेख की ओर...