हैडलाइन

सोल्ये बौद्ध विकास मंडळ व राजापूर तालुका बौद्धजन संघ तर्फे बौद्ध पौर्णिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सोल्ये बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण व राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्रं.11 च्या संयुक्त विद्यमाने बौद्ध पौर्णिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंती मोठ्या उत्साहात साजरी!



मुंबई ( प्रतिनिधी )

सोल्ये बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण व राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्रं.11 च्या संयुक्त विद्यमाने बौद्ध पौर्णिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोठया उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

बुद्धाने सांगितलेली समता प्रस्थापित करायची असेल तर स्रियांनी स्वतः सह आपल्या मुलींना शिक्षण आणि ज्ञानाच्या दिशेने झेपावण्यास योग्य संस्कार करायला हवा.

 सावित्रीमाईचा त्याग डोळयासमोर ठेवून महिलांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभे ठाकत, महागाई, बेरोजगारी, धर्मांधता आदी विद्यमान प्रश्नांवर बंड करायला हवे असे आमंदार विद्याताई चव्हाण यांनी सांगितले.

दारिद्रय, विषमता, शोषण, वर्णव्यवस्था, हिंसा आदी  विकृतीं विरोधात तथागत बुद्धाची लढाई होती असे  विचार  संविधान अभ्यासक विशाल हिवाळे यांनी व्यक्त केले.

माजी आमदार व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, संविधान अभ्यासक विशाल हिवाळे,  तहसीलदार शीतल जाधव, वैद्यकीय अधीक्षक - डॉ. राम मेस्त्री, प्रतिष्ठीत नागरिक शशिकांत प्रभुदेसाई, पोलीस पाटील विजय प्रभुदेसाई, सदस्य अरुण शिंदे, भारती पाटणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


 कोकण रेल्वे विद्युत वर चालविण्यात आलेल्या पहिल्या गाडीचा मान मिळालेले सोल्ये गावातील सुपुत्र प्रणय तांबे व कोरोना काळात कित्येक महिने गरीब व गरजू ना अन्न धान्य व जेवण, औषधे वाटप करणारे दांपत्य पत्रकार जीवन तांबे व प्रा.स्वानंदी तांबे यांचा सत्कार मा.आमदार विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. 


मान्यवर व  पोलीस अधिकारी अशोक तांबे, माजी अध्यक्ष अनंत ना.तांबे, राज सोलकर, अनंत रा तांबे, संजय कदम, सेवा निवृत्त चद्रकांत तांबे यांचा सत्कार अध्यक्ष हरेश तांबे,  ग्रामीण अध्यक्ष श्रीपत तांबे, संघाचे अध्यक्ष दिलीप तांबे, पत्रकार जीवन तांबे, पोलीस अधिकारी अशोक तांबे यांनी शाल, राज्य घटना प्रत  व बुद्धमूर्ती देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय तांबे- सर यांनी केले.


सचिव संदीप कदम, विलास कदम, मिलिंद कदम, शैलेश कदम, प्रफुल्ल तांबे,अभय कदम, कुणाल कदम अन्य पदाधिकारी यांनी अपार मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमात बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.



Most Popular News of this Week

अमेरिकेतून राहुल गांधींची...

अमेरिकेतून राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना  उघड…राहुल गांधी याचं...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!शिंदेसेना - भाजपचे गंभीर आरोपमुंबई।...

कांदा- सोयाबीन- धान...

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासादेवेंद्र फडणवीस यांनी...

आरक्षण संपवणारी योजना...

राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड…राहुल गांधी याचं...