महाराष्ट्रात आय३० लर्निंग सेंटर्स च्या ब्लेंडेड लर्निंगच्या प्रसारासाठी विवेक आनंद ओबेरॉय यांनी केली श्रेयस तळपदे बरोबर भागीदारी.

महाराष्ट्रात आय३० लर्निंग सेंटर्स च्या ब्लेंडेड लर्निंगच्या प्रसारासाठी विवेक आनंद ओबेरॉय यांनी केली श्रेयस तळपदे बरोबर भागीदारी...


प्रत्येक भारतीयाला परवडणारे शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या आय३० लर्निंग सेंटर्स ना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणार 


●ग्लोबल चक्र डेस्क 

 मुंबई: बंगलोर येथील एड-टेक कंपनी असलेल्या आयस्कॉलर नॉलेज सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड (आयकेएसपीएल) ने आज महाराष्ट्रा करता मास्टर फ्रॅन्चाईज चे मालक म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिथयश मराठी कलाकार श्रेयस तळपदे बरोबर सहकार्य करार केल्याची घोषणा केली.  आय ३० लर्निंग सेंटर म्हणून प्रसिध्द असलेल्या भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्‍या  कोचिंग सेंटर्स ही शृंखला असून या शृंखलेने गेल्या महिन्या आपल्या १०० व्या केंद्राची सुरूवात केली. हे केंद्र फरिदाबाद येथे असून सुरूवाती पासून दोन वर्षांच्या कालावधीत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.  

यावेळी बोलतांना आय३० लर्निंग सेंटरचे एमडी आणि सीईओ कर्नल (नि.) राजेंद्र प्रसाद नडेल्ला यांनी सांगितले “ फिजिटल मॉडेलच्या माध्यमातून जगभरांतील लोकांना शिक्षणाचा अनुभव, गुंतवणूक आणि त्यांतून निर्माण होणारे निष्कर्श समृध्द करण्याच्या  मिशनवर आम्ही आहोत.  लोकांना शिक्षण हे परवडणार्‍या दरात आणि सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने व आमच्या या विचारांशी सहमत असलेल्या लोकांबरोबर भागीदारी करण्यावर आमचा दृढ विश्वास आहे.  मला खात्री आहे की या भागीदारी मुळे या भागातील आमच्या वाढीला चालना मिळून आम्ही एक चांगला आणि शिक्षित भारत उभा करू शकू.”

आय३० लर्निंग सेंटरचे  चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विवेक आनंद ओबेरॉय यांनी सांगितले “ भारत ही अमेरिके नंतर सर्वात मोठी ई लर्निंगची बाजारपेठ आहे.  संशोधनातून असे समोर आले आहे की २०२५-२७ पर्यंत शिक्षण क्षेत्र हे २२५ बिलियन डॉलर्सचे क्षेत्र असेल.  पण हे सर्व शक्य करण्यासाठी आय३० लर्निंग सेंटर सारख्या ही बाजारपेठेतील दरी ओळखून ती कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.  त्याच बरोबर आमचे मॉडेल हे भारताला शिक्षण देऊन अधिक शक्तीशाली बनवेल.” 

आय३० लर्निंग सेंटर ची महाराष्ट्राच्या मास्टर फ्रॅन्चाईज चे मालक श्रेयस तळपदे यांनी सांगितले “ देशातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण नेऊन पोहोचवण्याचे कार्य मला आवडले आणि म्हणून मी यांचा भागीदार झालो.  मला आणखी एक गोष्ट आवडली ती म्हणजे स्थानीय शाळांबरोबर काम करून शिक्षकांची पध्दती आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असल्यामुळे आय३० लर्निंग सेंटर हे त्यांच्या भाषेत राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कौशल्य आणते.”


Most Popular News of this Week