कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आमदार मंगेश कुडाळकर यांचा मदतीचा हात!
मुंबई: कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर कॉ ऑप सोसायटी मधील धोकादायक इमारत कोसळली त्यात एकूण 19 जण मृत्यू झाले होते. या दुर्घटनेतील मृताच्या वारसाला पाच लाखांची तर जखमींना १ लाखांची मदत एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीने देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कुडाळकर यांनी पाच लाखाचा धनादेश प्रत्येक मृतांच्या वारसांकडे नुकताच देण्यात आला आहे.