हैडलाइन

कामण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन

कामण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन

महानगरपालिकेच्या सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्ववर्गणीतून केले नूतनीकरण


कामण (ता. वसई) येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील निवासी वैद्यकीय अधिकारी व आंतरवासियता विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे नूतनीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय व सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन १९८८ मधील माजी विद्यार्थ्यांनी स्ववर्गणीतून केले आहे. नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहीते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.


महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेले कामण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र हे जुहू येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाला वैद्यकीय प्रशिक्षणासाठी संलग्न आहे.  वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी व आंतरवासियता विद्यार्थ्यांना कामण ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात जाऊन वैद्यकीय सेवा करता येते. सदर प्रशिक्षण केंद्रातील निवासी वैद्यकीय अधिकारी व आंतरवासियता विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे नूतनीकरण स्ववर्गणीतून करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय व सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन १९८८ मधील माजी विद्यार्थ्यांनी घेतला आणि आवश्यक परवानगी प्राप्त करुन लागलीच त्याची अंमलबजावणी देखील केली. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाचे सन १९८८ चे विद्यार्थी तथा कूपर रुग्णालयातील विद्यमान शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. स्मृती घेतला, शल्यचिकित्सा विभागातील प्राध्यापक डॉ. (श्रीमती) गीता घाग यांच्यासह औषधशास्त्रज्ञ डॉ. मनीष गर्ग व विद्यार्थी दशेतील इतर सहकाऱयांनी मिळून स्ववर्गणी संकलित केली.


कामण ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या वतीने प्रशिक्षण केंद्रात नुकतेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचे औचित्य साधून या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शैलेश मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले. कूपर रुग्णालयाचे जनऔषधी प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी कामण ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात संपूर्ण वर्षभरात केलेल्या विविध कामकाजाची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. 


प्रशिक्षण केंद्राच्या आवारात नव्याने तयार करण्यात आलेली परसबागचे उद्घाटन, वृक्षारोपण, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात वर्षभरात केलेल्या कार्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले. स्थानिक रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती म्हणून, सर्पदंश झाल्यास त्यावर करावयाचे उपचार व सर्पदंश टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याविषयी पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. (श्रीमती) किंजल यांनी सविस्तर माहिती दिली. याच विषयावर आंतरवासियता विद्यार्थ्यांनी पथनाट्य देखील सादर केले. 


ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुळे व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. कूपर रुग्णालयाचे कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. निनाद गायकवाड, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी माने, शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. स्मृती घेतला, बालरोगतज्ञ विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. बराटू, डॉ. (श्रीमती) रोशनी मिरांडा, श्री. अनिकेत इंगळे, डॉ. (श्रीमती) रिमा वानकर, डॉ. (श्रीमती)अम्रीन शेख यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

सहयोगी प्राध्यापक डॉ. (श्रीमती) स्मिता चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद ढिकले यांनी आभार मानले. 



Most Popular News of this Week

राज्यसभा निवडणुकीसाठी...

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा...

राज्यसभेकडे पार्थ पवारांची...

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ...

*एएआयबीच्या अहवालावर रोहित...

मुंबई दि. 4 मार्चएखाद्या व्हीआयपीच्या किंवा कोणत्याही दुर्घटनेचा तपास होत...

राज्यसभा में दबे-कुचले वर्ग...

राज्यसभा में दबे-कुचले वर्ग की आवाज बनेंगी डॉ. ज्योति वाघमारेशिवसेना को आम...

पालिका अधिका-यांच्या...

पालिका अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे भांडुप विभागातील अनेक शौचालयांची...

HPCL SC 8 विकेट से जीता; आर्यन...

 पर - इंश्योरेंस शील्ड क्रिकेट टूर्नामेंटमुंबई: ओरिएंटल इंश्योरेंस...