सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांचा संकल्प
चेंबुर घाटला परिसरातील महीलांना बनविणार १००% संगणक साक्षर अभियान
●ग्लोबल चक्र न्यूज
मुंबई: चेंबुर खारदेवनगर घाटला परिसर हा बहुसंख्य झोपडपट्टी चाळींचा प्रभाग येथील महीलांना मोफत संगणक प्राशिक्षण देऊन बदलत्या युगासोबत महीलांना संगणक शिकवुन बनविणार सुपर वुमन श्री कंम्प्युटर इंन्स्टीट्युट चे संचालक दशरथ यादव सर यांच्या सहकार्याने हा संकल्प पुर्ण करण्याचा मानस केला आहे. ह्या अभियानात महीलांना संगणकाची प्राथमिक माहिती दिली जाणार असुन १० दिवस दररोजच्या व्यवहारी जिवनात संगणकाचे महत्त्व व तो कसा वापर व कसा हातळायचा याच प्राशिक्षण दिल जाणार आहे.
याचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते कीशोरदादा जगताप यांच्या शुभहस्ते तसेच मनसे नेते व मा. नगरसेवक राजाभाऊ चौगुले ,झेब्रो फाऊंडेशन चे अध्यक्ष आशिष गडकरी , सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई पाटिल ,मिनाक्षी देशमुख ,रेखा सावंत , यमुना मुळीक निलिमा शिंदे , कवी गणेश मिरगुले ,योगेश पाटिल , मुन्नवर शेख ,विश्वनाथ आवळे , शिवाजी झोरे , विनोद गुप्ता , उत्तम पवारआदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील कंठे ,प्रमोद केंजळे , मिलींद खरात ,रोषन अवघडे , भाई लिंगायत आदिनी विशेष परिश्रम घेतले.