बीएमसी आणि युवा चेंबूर प्रतिष्ठान सोबत मैत्रीपार्क ट्रॅव्हल्स युनियन ने राबविले स्वच्छता अभियान

बीएमसी आणि युवा चेंबूर प्रतिष्ठान सोबत मैत्रीपार्क ट्रॅव्हल्स युनियन ने राबविले स्वच्छता अभियान 



ग्लोबल चक्र न्यूज़ डेस्क 

मुंबई: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून होणार्‍या स्वच्छ सुंदर मुंबई, स्वच्छता अभियाना अंतर्गत गुरुवारी चेंबूर येथील मैत्री पार्क एस टी स्टँड परिसराची  स्वच्छता  करण्यात आली. त्या प्रसंगी महानगर पालिकेचे कर्मचारी व युवा चेंबूर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक तसेच मैत्रीपार्क ट्रॅव्हल्स युनियन चे धनंजय कोळकर व त्यांची टिम यांनी  स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 


या दरम्यान  वार्ड 154 चे  माजी नगरसेवक व  युवा चेंबूर प्रतिष्ठान चे अध्यक्ष महादेव शंकर शिवगण यांनी  धनंजय कोळकर व त्यांच्या टीम सोबत स्वतः रस्त्यावर उतरून साफ़ सफाई केली.



Most Popular News of this Week