हैडलाइन

बेस्ट कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यां मान्य: कामगारांने मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे नरेश मस्के यांचे आभार

बेस्ट कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यां मान्य 

कामगारांने मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे नरेश मस्के यांचे आभार 


ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई: बेस्ट कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांकरिता आझाद मैदान येथे सात दिवसांचे धरणे आंदोलन सुरू असताना आंदोलन स्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार भेट देऊन कामगारांच्या अडचणी समजून घेऊन मुंबईकरांची गैरसोय दूर व्हावी याकरता आंदोलन मागे घेण्याची विनंती माननीय श्री नरेश मस्के साहेब (शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते) यांनी केली त्यानुसार महाराष्ट्र राज्य कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष श्री जेरी डेव्हिड यांच्या मध्यस्थीने राजू सुर्वे,  नागेश तवटे,  सुरेश तोडकर, रवी जाधव,  राजेश सकपाळ यांच्या उपस्थितीत कामगारांनी दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी आंदोलन मागे घेतले कामगारांना आश्वासित केलेल्या मागण्याची पूर्तता करण्याकरता दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल, बेस्टचे ठेकेदार आणि कामगारांचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत बेस्ट भवन मुंबई येथे कामगारांच्या मागण्या व प्रश्न या विषयावर माननीय नरेश मस्के साहेब यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत कामगारांच्या दिवाळी बोनस, भर पगारी रजा मिळणे, मोफत बस प्रवास, न्यायालयीन केसेस रद्द करणे इत्यादी सर्व मागण्या मंजूर करून त्यांच्या महिना बेसिक पगारात सुमारे 1200/_रुपयाची वाढ करण्यात आली. बेसिक पगार रुपये बाराशे आणि भर पगारी रजा एकूण रुपये 4000 ते 5000 इतकी भरघोस पगार वाढ झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण झाले आहे. या पगारवाढचा सुमारे अकरा हजार कामगारांना लाभ मिळणार आहे. सदरच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष जेरी डेव्हिड माजी नगरसेवक किरण लांडगे नागेश तवटे सुरेश तोडकर राजेश सकपाळ श्री रघुनाथ खजूरकर इत्यादी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते सर्व कामगारांनी महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे नरेश मस्के आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार मानले.



Most Popular News of this Week

महाराष्ट्रातील महिलांवरील...

महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण: MVA आणि महायुती युगामध्ये...

"संविधान जागर यात्रा 2024: मजबूत...

"संविधान जागर यात्रा 2024: मजबूत लोकशाहीच्या दिशेने"आपल्या देशात संविधान लागू...

"संविधान जागर यात्रा 2024: सशक्त...

 "संविधान जागर यात्रा 2024: सशक्त नागरिकता की एक नई शुरुआत"?मुंबई। अपने देश...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, DGP...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर फक्त गुन्हे दाखल करून चालणार...