चेंबूर सकल मराठा समाज आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ कॅण्डल मार्च ला आंबेडकरी जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद
●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क
मुंबई: महाराष्ट्रमध्ये जागोजागी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण बाबतीत उपोषणास चेंबूर खारदेवनगर सावली नाका येथून मशाल प्रज्वलीत करून शुभारंभ झाला मोठया प्रमाणात मराठा समाजातील बंधू-भगिनी, युवक, युवती यांनी सर्व राजकीय हेवे-दावे, वयक्तिक राग-रुसवा बाजूला सारून आपल्या येणाऱ्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी या पदयात्रेत सहभागी झाले.
संपूर्ण महाराष्ट्रभर मोठया प्रमाणात योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ मिळत असलेल्या प्रतिसाद आणखी म्हणजे आंबेडकरी जनतेने आरती ओवाळून ज्योतीस हार घालून व पडायत्रेत सहभागी मराठा समाज बांधवाच्या अंगावर पुष्णवृष्टी करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषच्या घोषणा देऊन स्वागत केल. त्यामुळे खरी शिवरायाच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची नांदी चेंबूर मधून झालेली दिसली.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या पदयात्रेची सांगता घाटले गांवदेवी मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून गोवंडी पोलीस ठाण्याच्या पोलीस बांधवांचे आभार मानून महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने झाली.