हैडलाइन

मिहिर कोटेचा 24x7 लोकांसाठी काम करतात, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मिहिर कोटेचा 24x7 लोकांसाठी काम करतात, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महायुती एका टीमसारखं काम करत आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे - कोटचा


मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी भांडुपमध्ये महायुती कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुंबई उत्तर पूर्वचे भाजप-महायुती लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटचा 24x7 लोकांसाठी काम करतात आणि आपण त्यांना खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले पाहिजे. 


मी मिहिर कोटेचा आमदार म्हणून काम करताना पाहिले आहे. ते 24x7 लोकांसाठी काम करतात. त्यामुळे जनतेसाठी रात्रंदिवस झटणारा उमेदवाराला आपण ताकद दिली पाहिजे, त्याला लोकसभेत पाठविले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. 


यावेळी मोठ्या संख्येने भाजप नेत्यांसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (ए) आणि इतर घटक पक्षांचे  कार्यकर्ते उपस्थित होते. 


कोटचा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, या मतदारसंघातून माझे नाव जाहीर होऊन ५३ दिवस झाले आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी हाती घेतलेल्या विकासकामाची गंगा घरोघरी पोहोचली आहे असा अनुभव मला माझ्या प्रचारात आला आहे. विरोधकांकडे बोलायला काही नसल्यामुळे केवळ 3-4 मुद्द्यांची पुनरावृत्ती करत आहेत पण लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. महायुतीमध्ये सात पक्ष आहेत, पण आपण एका टीमसारखे काम करत आहोत, असे कोटेचा म्हणाले. 


मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मुंबई उत्तर पूर्व जागेचे अहवाल कोटेचा यांच्या बाजूने आहेत.  जरी लोक आमच्या बाजूने असले तरी मतदान होईपर्यंत आम्ही उसंत घेवू नये. आपण आपले राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील  विकास कामे लोकांपर्यंत घेवून गेले पाहिजे. कोणत्या भागातून किती लीड मिळते त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरवले जातील. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवावेत आणि सर्वांनी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुतीसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी केले.


Most Popular News of this Week

महाराष्ट्रातील महिलांवरील...

महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण: MVA आणि महायुती युगामध्ये...

"संविधान जागर यात्रा 2024: मजबूत...

"संविधान जागर यात्रा 2024: मजबूत लोकशाहीच्या दिशेने"आपल्या देशात संविधान लागू...

"संविधान जागर यात्रा 2024: सशक्त...

 "संविधान जागर यात्रा 2024: सशक्त नागरिकता की एक नई शुरुआत"?मुंबई। अपने देश...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, DGP...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर फक्त गुन्हे दाखल करून चालणार...