राष्ट्रीय बंजारा परिषदेचा मिहिर कोटेचा यांना पाठिंबा
परिषदेचे पंडित राठोड यांनी आज पत्र देवून दिला पाठिंबा
मोदीजीना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी घेतलेल्या भूमिकेसाठी आभार -कोटेचा
मुंबई: भाजप महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवार मिहिर कोटेचा यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेने पाठिंबा जाहीर केला आहे. कोटेचा यांनी परिषदेने मोदीजीना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी घेतलेल्या भूमिकेसाठी आभार मानले आहेत.
मोदीजीनी मागील दहा वर्षात समाजातील सर्व घटकांना सामावून घेत विकासाची गंगा घरोघरी पोहोचवली आहे. त्यामुळे जनता स्वतःहून पाठिंबा देत मोदीजीना तिसऱ्यांदा आशीर्वाद देत आहेत. त्याबद्दल मी परिषदेचे आभार मानतो, असे कोटेचा यांनी सांगितले.
परिषदेचे महासचिव पंडित राठोड यांनी सांगितले की लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू संकल्पनेसाठी आणि देशामध्ये नरेन्द्र मोदी यांचे आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात बळकट करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे परिषदेचे महासचिव पंडित राठोड यांनी सांगितले.
बंजारा समाजाची विशिष्ट लोकसंख्या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात आहे. बंजारा समाज निर्णायक भूमिका निभावेल, असेही त्यांनी सांगितले.