हैडलाइन

'अरबोरिकल्चर' आणि 'विकास-कामे' हातात हात घालून सोबत काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

" विकासाची कामे आणि वृक्ष संवर्धन हे परस्पर विरोधी नाही तर विकास कामासोबतच शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष संवर्धन करून शाश्वत विकास, हेच राज्य शासनाचे धोरण आणि ध्येय असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषदेत केली."

ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषदेच्या ( वृक्षवर्धन २०२६) दुमुंबईतील हॉटेल सहारा येथे पार पडली या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या हरीत धोरणाची दिशा स्पष्ट केली.अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे परिषदेच्या आयोजन केले होते.


यावेळी ATCA संघटनेचे संचालक वैभव राजे, संचालक नकुल सावनी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे CEO आर्यन पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे, दापोली वन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय राणे, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ अर्बोरीकल्चर च्या मुख्याधिकारी कॅटलीन पॉलीहान, अरबोरिकल्चर असोसिएशन, इंग्लंडचे मुख्याधिकारी जॉन पारकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नानाजी देशमुख फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पांडे म्हणाले, " अरबोरिकल्चर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती म्हणजे संधीचे सोने आहे. त्यामुळेच सीएसआर फ्रंट च्या माध्यमातून अस्तित्वात असलेल्या झाडांचे संवर्धन, सर्व पायाभूत सुविधा विकासामध्ये अरबोरिकल्चर इम्पॅक्ट असेसमेंट  अहवालाचा समावेश आणि प्रत्येक जिल्ह्यात हेरिटेज झाडांचे संवर्धन आणि प्रत्येक जिल्ह्यात वृक्षांची प्रयोगशाळा उभारण्यात यावी."


या मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सी एस आर फंड मधून झाडांचे संवर्धन, पायाभूत सुविधा विकासामध्ये अरबोरिकल्चर  इम्पॅक्ट असेसमेंट अहवालाचा समावेश आणि प्रत्येक जिल्ह्यात हेरिटेज झाडांचे संवर्धन आणि प्रत्येक जिल्ह्यात वृक्षांची प्रयोगशाळा या तिन्ही मागण्यांची उपयुक्तता आणि व्यवहार्यता लक्षात घेऊन राज्याच्या धोरणामध्ये समावेश करण्यात येईल असे सांगितले.

मुख्यमंत्री  म्हणाले, दोनच दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे त्यामध्ये आपण तीनशे कोटी वृक्षांची लागवड करण्याचे ठरवले आहे. ही सगळी  वृक्ष लागवड मिशन मोड मध्ये होणार आहे. वनांचे क्षेत्र 33 टक्क्यावर नेण्यासाठी आपण प्रकल्पामध्ये विस्थापित झालेल्या वृक्षांची पुनर्लागवडीची यशस्विता 30% वरून 80 टक्के पर्यंत वाढवली आहे.

भारताची संस्कृती आणि साधू संतांचे विचार हे वृक्ष संवर्धनाच्या बाजूचे आहेत. संत तुकाराम यांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे 'असे सांगून वृक्षांची महती आणि महत्त्व सांगितले.


वृक्ष आयुर्वेदा म्हणजे भारताची पारंपारिक अरबोरीकल्चर व्यवस्था असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आपले पारंपारिक ज्ञान संपुष्टात आले असले तरी आधुनिक अरबोरिकल्चरच्या साह्याने आपण शाश्वत विकास आणि वातावरण बदलाचे संकट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी वातावरण बदलाच्या संकटाला सहन करणारी आपली पहिली पिढी आणि रोखण्यासाठी प्रयत्न करणारी शेवटची पिढी असू अशी भावना व्यक्त केली होती.

निश्चितपणे आपण या नवतंत्रज्ञानाच्या मदतीने वृक्ष संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. अरबोरिकल्चर परिषदेतील विचार मंथन आणि अभ्यास निष्कर्षावर निश्चितपणे सरकार विचार करेल. सर्व सहभागींचे मी अभिनंदन करतो. आणि हा शाश्वत विचार पुढे घेऊन जाण्याची हमी देतो असे देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी सांगितले.


नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ACTA चे संचालक वैभव राजे यांनी अरबोरिकल्चर चा प्रवास मांडताना दहा वर्षांपूर्वी वृक्ष संपत आहेत हे लक्षात आल्यानंतर इंग्लंडमधील उच्च शिक्षणात अरबोरिकल्चरचा अंगीकार केल्याचे सांगितले.

दोन वर्षांपूर्वी अरबोरिकल्चर परिषदेच्या माध्यमातून सुरुवात करताना हा प्रवास भव्य परिषदेमध्ये रूपांतरित होईल असे वाटले नव्हते. परंतु आता धोरणकर्त्यांसह प्रत्येकाच्या तोंडात अर्बोरीकल्चर हा शब्द आहे निश्चितपणे वृक्ष संवर्धनाची ही चळवळ तुमच्या आमच्या जगण्याचा हिस्सा बनेल असे वैभव राजे म्हणाले.

ATCA चे संचालक नकुल सवानी यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना उपस्थितांचे आभार व्यक्त केले.




Most Popular News of this Week

स्वामी समर्थांच्या प्रकट...

भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगर आणि साई हिल परिसरात श्री स्वामी समर्थ...

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या...

मुंबई शहर उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून पालिकेच्या...

मुंबई काँग्रेसचे एलपीजी गॅस...

अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा मुंबईसह राज्यात जाणवू...

सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त...

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनखार-पामबीच परिसरात हिंदू नववर्षाचे...

INDIAN NAVY CONTINUES IOS SAGAR INITIATIVE TO STRENGTHEN MARITIME PARTNERSHIP...

 Reaffirming India’s commitment to collaborative maritime security in the Indian Ocean Region, the second edition of Indian Ocean Ship (IOS) SAGAR commenced on 16 Mar 2026 .The Indian Navy...

मुख्य सचिवांनी घेतली...

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल  यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु...