हैडलाइन

परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये सुरक्षिततेची अनोखी भेट

भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये एक स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे महापौर आणि 'जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांच्या सौजन्याने शहरात 'मोफत हेल्मेट वाटप' भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १८ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला वाहनचालकांचा आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठकार, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील,  नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले.  जनतेच्या सुरक्षिततेशी निगडित असलेला हा उपक्रम राबवून आयोजकांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे.  यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गजानन घाडघे, नगरसेवक अजय बहिरा, सुमित झुंझारराव, सुनील बहिरा,  माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी शिवनेकर, उमेश इनामदार, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...