हैडलाइन

शिवाजी पार्क येथे रंगणार इनडोअर क्रिकेटचा जल्लोष

मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आता पारंपरिक क्रिकेटसोबतच वेगवान, आक्रमक आणि थरारक इनडोअर क्रिकेटची भन्नाट मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे २२ ते २४ मे २०२६ दरम्यान भव्य ‘महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले असून, दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर क्रिकेटचा हा नवा अवतार रंगणार आहे. २२ मे रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सामने रंगणार आहेत. तर २३ आणि २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सामने खेळवले जाणार आहेत. इनडोअर क्रिकेटच्या भन्नाट फॉरमॅटमुळे प्रेक्षकांना प्रत्येक चेंडूवर रोमांच अनुभवायला मिळणार आहे.

८ षटकांचा वेगवान आणि रोमांचक फॉरमॅट

कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असणार असला, तरी प्रत्यक्ष मैदानावर एका वेळी ८ खेळाडू खेळणार आहेत. प्रत्येक संघाला एक फलंदाजी आणि एक गोलंदाजी डाव मिळणार असून, प्रत्येक डाव ८ षटकांचा असेल. विशेष म्हणजे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकणे बंधनकारक असेल. दुखापतीचा अपवाद वगळता कोणालाही एकापेक्षा जास्त षटके टाकता येणार नाहीत. त्यामुळे केवळ ताकद नव्हे, तर अचूक रणनीती आणि वेगवान निर्णयक्षमतेची खरी कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्रात इनडोअर क्रिकेटची नवी क्रांती

इनडोअर क्रिकेटचा हा नवा फॉरमॅट महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असून, राज्यभरातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती येथील क्रीडा आयोजकांनी लवकरच जुनिअर गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांनी दिली. मुंबईत सुरू झालेला इनडोअर क्रिकेटचा हा नवा थरार आता संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट संस्कृतीत वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने झेपावताना दिसत आहे.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...