हैडलाइन

एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न

            नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थात एनएमएमटी बससेवेच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट होत असलेल्या 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत घणसोली आगारात संपन्न झाले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समितीचे सभापती रविकांत पाटील, प्रभाग समितीच्या अध्यक्ष ललिता मढवी आणि इतर नगरसेवक, परिवहन समिती सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       

          पर्यावरणपूरक, आधुनिक व प्रवासी सुविधांनी सुसज्ज अशा सीएनजी बसेसचा समावेश एनएमएमटीच्या ताफ्यात झाल्यामुळे परिवहन उपक्रमामार्फत पुरविण्यात येणाऱ्या प्रवासी सेवेत मोठी भर पडणार आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 416 बसेस कार्यरत आहेत. उपक्रमाच्या ताफ्यात नव्याने एकूण 150 सीएनजी बसेस समाविष्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 65 बसेस उपक्रमास प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित 85 बसेस नजीकच्या कालावधीत उपक्रमास प्राप्त होणार आहेत. लोकार्पण समारंभप्रसंगी 51 सीएनजी बसेसचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी नव्या सीएनजी बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवास सुविधा उपलब्ध होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे इंधन खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे याचाही विशेष उल्लेख त्यांनी केला.

        

          नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४०० महिलांना नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत बसचालक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले, ज्या माध्यमातून एनएमएमटी बसेस चालवण्यासाठी आगामी काळात महिला बस चालक उपलब्ध होतील असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईकरांना एनएमएमटी मार्फत चांगली व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.  परिवहन समितीचे सभापती  विकास झंजाड यांनी परिवहन उपक्रमाच्या प्रगतीसाठी व उपक्रम स्वयंपूर्ण होण्यासाठी घेतल्या जात असलेल्या विविध निर्णयांची माहिती देत परिवहनच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी परिवहन उपक्रमाच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व परिवहन समिती सदस्य तसेच परिवहन व्यवस्थापक उमाकांत जंगले, मुख्या लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता विवेक अचलकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...