हैडलाइन

पुणे मेट्रोच्या प्रत्येक डीपीआरच्या निर्मितीपासून ते मंजुरीपर्यंत आदरणीय अजितदादांचं मोलाचं योगदान राहिलं आहे

पुणे दि. ३ नोव्हेंबर - आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करणे काळाची गरज होती आणि आजचे पुणे मेट्रो हे लोकार्पण आणि भूमिपूजन याच दिशेनं टाकलेली मोठी पावले आहेत असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले. सन २०१८ मध्ये या मेट्रो मार्गिकेची आधारशिला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ठेवली गेली होती, आणि आज ती राष्ट्राला समर्पित होत आहे. टप्पा २ च्या चारही मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याचं भूमिपूजनही आज होत आहे. त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले.पुणे मेट्रोच्या प्रत्येक डीपीआरच्या निर्मितीपासून ते मंजुरीपर्यंत आदरणीय अजितदादांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. डीपीआरच्या मंजुरीसाठी ते केंद्रसरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करत असत.अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला होता हेही आवर्जून सुनेत्रा पवार यांनी सांगितले.


राष्ट्रीय मेट्रो रेल धोरणातंर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभा राहिलेला मार्गिका ३ हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. टाटा, आणि सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. थर्ड रेल तंत्रज्ञानावर आधारित महाराष्ट्रातील ही पहिलीच मार्गिका आहे. या मार्गावर आर. के. लक्ष्मण संग्रहालयाचं एक स्थानक आहे. लक्ष्मण यांनी आयुष्यभर आपल्या 'कॉमन मॅन'च्या नजरेतून देश पाहिला. ही मेट्रोसुद्धा त्याच सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासासाठी आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.विशेष म्हणजे, पुणे मेट्रो मार्गिका ३ ही देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो मार्गिका ठरणार आहे. सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी याचं संचालन करणार आहेत. शिवाय 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' हे स्थानक सावित्रीबाईंच्या कार्याला दिलेली खरी आदरांजली आहे असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.आज भूमिपूजन होत असलेल्या विस्तारित मार्गिकांमुळे वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जातील. ३१ किमी लांबीच्या आणि २८ स्थानकांच्या या मार्गिकांसाठी केंद्रसरकारने सुमारे ९ हजार ८५८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे मेट्रोचं जाळं १०० किलोमीटरच्या पुढे जाईल.


गेल्यावर्षी जुलै महिन्यात दादा स्वतः हिंजवडीत आले. त्यांनी मेट्रो स्थानकांची पाहणी केली, आढावा बैठक घेतली आणि कामं वेगानं, पण दर्जा राखूनच पूर्ण झाली पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. पावसात हिंजवडीत पाणी साचता कामा नये, हा त्यांचा आग्रह होता याची आठवणही सुनेत्रा पवार यांनी सांगितली.सप्टेंबर महिन्यात आम्ही हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्सची घोषणा केली. रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी या सर्व प्रश्नांवर नियमित समन्वय बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ही कामं केवळ कागदावर राहणार नाहीत, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरतील, याकडे पालकमंत्री म्हणून स्वतःचं बारकाईनं लक्ष असणार आहे, अशी खात्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...