मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (C&D Waste) होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेसंदर्भातील छायाचित्रे…