राहुल गांधी कडे चंद्रकांत हंडोरे यांनी केली क्रॅास मतदान करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
●ग्लोबल चक्र न्यूज
दिल्ली: कॅाग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व युवा नेते राहुल गांधी तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीमधे २६ मते जिंकण्याकरीता आवश्यक असतांना हंडोरे यांना कुठल्याही प्रकारे धोका होऊ नये म्हणुन पहिला पसंतीचा २९ मतांचा कोटा सुद्धा पक्षश्रेष्ठींनी निश्चित केला होता, परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत हंडोरे यांना २२ मते पडली व चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. निवडणुकीत ७ मते फुटल्या गेली व त्यात काही क्रॅास मतदान झाले. कदाचित हंडोरे हे दलीत समाजातुन येत असल्याने त्यांच्या बाबतीत असा अन्याय झाला असावा असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे व नसिम खान यांनी दिल्ली येथे पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन ज्यांच्यामुळे हंडोरे यांचा पराभव झाला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती केली.
यावेळी राहुलजी गांधी यांनीही या प्रकरणी नोंद घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे सुतोवाच केले.