राष्ट्रवादी नेत्या सना मलिक तर्फे SEO अमरनाथ कैथवास यांचा सत्कार
●ग्लोबल चक्र न्यूज
मुंबई: अणुशक्ती नगरच्या मतदारसंघातील समस्यांबाबत स्थानिक रहिवाशांशी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी तालुका कार्यालयात राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सनाताई मलिक शेख उपस्थित होत्या. त्यांचा हस्ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अणुशक्ति नगर तालुक्याचे सदस्य अमरनाथ कैथवास यांची आमदार नवाब मलिक यांच्या शिफारिशिने महाराष्ट्र राज्य विषेश कार्यकारी अधिकारी (S.E.O) पदी नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस अणुशक्ती नगर तालुका सचिव राजेश शुक्ला आणि वॉर्ड अध्यक्ष (146) वल्ली तेवर सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.