हैडलाइन

कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत ;ताकीद द्या - अजित पवार

कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत ;ताकीद द्या - अजित पवार 


अमित शहा यांना एक पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करा


.ग्लोबल चक्र न्यूज़ डेस्क 

नागपूर: कर्नाटकचे विधी मंत्री माधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी त्यांच्या विधानसभेत केली आणि मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहतात असा जावईशोधही लावला आहे. कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई तर कर्नाटकचीच आहे असा दावा करुन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात कन्नड नाहीत का? असा सवाल करतानाच विविध प्रांतातील लोकं महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहतात याचा सगळ्यांना अभिमान आहे. त्यामुळे सीमा प्रश्नावर अशाप्रकारचे चुकीचे वळण देण्याचे व सीमावासियांच्या भावनेला ठेच पोचवण्याचे काम कर्नाटक सरकारकडून वारंवार होते आहे. या दोन्ही वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध मुख्यमंत्री यांनी करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. 


सीमावासियांच्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे असा ठराव एकमताने सभागृहात केला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने त्यांना जशास तसे उत्तर दिले जात नाही त्यामुळे त्यांची भीड चेपली गेली आहे अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान कर्नाटकच्या विधी मंत्र्यांचा व आमदाराचा तीव्र शब्दात अजित पवार यांनी निषेध व्यक्त केला.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध करतानाच याबाबत निषेधाचे पत्र पाठवले जाईल आणि गृहमंत्र्यांच्या हे समोर ठरले असताना त्याचे पालन कर्नाटक सरकार करत नाही हे गृहमंत्र्यांना सांगणार आहे असे सभागृहात सांगितले.


Most Popular News of this Week

अमेरिकेतून राहुल गांधींची...

अमेरिकेतून राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना  उघड…राहुल गांधी याचं...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!शिंदेसेना - भाजपचे गंभीर आरोपमुंबई।...

कांदा- सोयाबीन- धान...

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासादेवेंद्र फडणवीस यांनी...

आरक्षण संपवणारी योजना...

राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड…राहुल गांधी याचं...