रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी दिनेश म्हसकर तर सचिवपदी प्रियांका दुडेजा
बदलापूर: कुळगाव बदलापूर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता या शहरात रोटरी क्लब ही समाजिक काम करणारी अग्रगण्या संस्था आहे. रोटरीचे जाळे जग भर पसरलेले आहे याचं अनुषणगाने बदलापुरात आणखी एक क्लब तयार झाला पाहिजे कारण या शहराच्या वाढीचा वेग प्रचंड आहे त्यामुळे या शहरात आणखी एक क्लब स्थापन झाला पाहिजे याची जबाबदारी रोटरी चे जिल्हा प्रांतपाल कैलाश जेठानी यांनी रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रिअल एरियाचे डॉ. नितीन चोणकर व डॉ. विद्या राठोड यांच्यावर सोपवली बदलापूर शहरातील डॉक्टर, अभियंते, वकील, उद्योजक, समाजसेवक, महिला उद्योजिका, शिक्षक, सरकारी कर्मचारी, बँकर, खाजगी अस्थापनात कामकरणारे लोक, एन.जी.ओ मधील लोक अश्या शहरातील मान्यवर तथा प्रतिष्ठीत लोकांना घेऊन नवीन क्लब ची स्थापना करावी अश्या सुचना जिल्हा प्रांतपाल कैलाश जेठानी यांनी डॉ. नितीन चोणकर व डॉ. विद्या राठोड यांना दिल्या. जेठानी यांच्या सूचने नुसार रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी या बदलापुरातील चौथ्या क्लब ची स्थापना करण्यात आली हा क्लब कैलाश जेठानी कारकिर्दीत करण्यात आला असून सन २०२२-२३ साठी रोटरी इनरनॅशनल चे हे फॅब वर्ष सुरु आहे. जून २०२४ पर्यंत दिनेश म्हस्कर व प्रियांका दुडेजा यांची निवड करण्यात आली यावेळी रोटरीचे जिल्हा प्रांतपाल श्री कैलाश जेठानी, उपजिल्हा प्रांतपाल ऍड. स्वप्नील वर्मा, तसेच विजय शेट्टी व गुल अडवाणी, श्रीजीत पुतेन, प्रकाश शहा, हर्ष मकोळ, ललित माणिक, प्रमोद मिश्रा, यांच्या उपस्थिती दिनेश म्हस्कर व प्रियांका दुडेजा यांना पदभार दिला यावेळी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी चे सर्व रोटेरियन त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमचे सूत्रसंचलन डॉ सुतेजा स्वामी व नितू यांनी केले तर आभार प्रदर्शन शशांक राजुळवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऍड तुषार साटपे, उमेश कांबळे, वरून मौर्या, बिपीन दुबे, डॉ. देवकुमार शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतली सदर कार्यक्रम उत्सव बँकवेट हॉल हेंद्रेपाडा येथे संपन्न झाला.