रोटरी इंटरनॅशनल च्या ११८ व्या वर्षानिमित्त रक्तदान शिबीर आयोजीत
बदलापूर: रोटरी इंटरनॅशनल चे ११८वे वर्ष जुलै पासून सुरु झाले. प्रांत ३१४२च्या संपूर्ण प्रांतातील सर्व क्लबच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करून नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
बदलापूर मधील रोटरी क्लब बदलापूर, बदलापूर सिटी, बदलापूर स्मार्ट सिटी व बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया या चार क्लबच्या संयुक्त विद्यमाने एस.डी.एम.इंग्लीश हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे अर्पण रक्तपेढी कल्याणच्या सहाय्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
प्रांत ३१४२ चे सन २०२३-२४चे प्रांत सचिव रो. हरप्रीतसिंग भाटिया उपस्थित होते. क्लब अध्यक्ष रो.कपिल पढेर, अध्यक्ष डॉ.दिलीप चौधरी, अध्यक्ष सचिन रसाळ, अध्यक्ष दिनेश म्हसकर आणि चारही क्लबचे सभासद उपस्थित होते.
या शिबिरात ६३बाटल्या रक्त गोळा झाले.