महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी संधी दिल्याबद्दल मानले पक्ष नेतृत्वाचे आभार
मोठ्या मताधिक्याने जिंकू, विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी काम करणार - कोटेचा
मुंबई : भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी त्यांना संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत करण्यासाठी ते लोकांसमोर जाणार असल्याचे सांगितले.
कोटेचा यांनी या जागेवर प्रचंड बहुमताने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. "पुन्हा एकदा, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी, आमचे पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे कोटेचा म्हणाले.
कोटेचा पुढे म्हणाले की या जागेवर मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याची खात्री आहे. आता, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताचे ध्येय ठेवून विकासाच्या नावावर लोकांची मते मागण्यासाठी मी पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचेन, असे कोटेचा यांनी सांगितले.