हैडलाइन

मिहिर कोटेचा यांचा उद्यानात 'मॉर्निंग वॉक'

मिहिर कोटेचा यांचा उद्यानात 'मॉर्निंग वॉक'

 मुलुंड (पश्चिम) येथील सरदार प्रताप सिंग पार्कमध्ये साधला सर्व वयोगटातील लोकांशी संवाद

गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि बर्ड पार्क, मुलुंड टर्मिनस, इत्यादी कामांबाबत बोललो - कोटेचा

विकसित भारत, विकसित महाराष्ट्र करण्यासाठी लोकांचा वाढता पाठिंबा - कोटेचा

मुंबई : भाजपचे आमदार आणि मुलुंडचे विधानसभा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि हाती घेतलेल्या कामांबाबत माहिती देण्यासाठी लोकांशी संवाद साधण्यासाठी उद्यानांमध्ये 'मॉर्निंग वॉक' सुरू केला.

कोटेचा यांनी शनिवारी सकाळी मुलुंड (पश्चिम) येथील सरदार प्रताप सिंग पार्कला भेट दिली.  विविध विकास कामांवर त्यांनी तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील लोकांशी संवाद साधला. 

यावेळी आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले की त्यांच्यासोबत मॉर्निंग वॉक करताना खूप चांगला संवाद झाला. मी मुलुंडमध्ये गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आता विविध डीपी रस्ते, बर्ड पार्क, मुलुंड टर्मिनस, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत रोपवे यासह इतर प्रकल्पांबाबत देखील चर्चा झाल्याचे कोटेचा यांनी सांगितले. 

कोटेचा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेने पाठिंबा दिला असून विकसित महाराष्ट्र करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी पाठिंबा आणि आशीर्वादही दिले, असे कोटेचा म्हणाले.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...

VJTI वसतिगृहातील नरकयातना आणि...

​महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित व ऐतिहासिक 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान...

अंगणवाडी सेविकेच्या...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीत १८ वर्षांपासून...

सायबर गुन्हेगारांना...

मुंबईतील सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करताना दक्षिण विभाग सायबर...