शिवसेनेच्या मुख्य धारे सोबत पर्यावरण संवर्धन जतन,जनजागृती आणि व्यवस्थापन या मुख्य हेतूने शिवसेनेच्या सलग्न अशा आनंदयात्री पर्यावरण सेना हा विभाग नुकताच काही दिवसापूर्वी जाहीर झाला असून, या विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि पर्यावरण साथी तानाजी घाग यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीनंतरच्या प्रत्येक दिवशी मुंबई ठाणे सह एम एम आर कार्यक्षेत्रातील शिवसेना मुख्य धारेच्या पदाधिकाऱ्यांसह गणेश उत्सवाचे औचित्य साधून शेकडो गणेश पंडाल आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आनंदयात्री पर्यावरण सेनेच्या ध्येय धोरणाबाबत पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी अध्यक्ष तानाजी घाग कार्यरत झाले आहेत.
गणेश उत्सवानंतर मुंबई,ठाणे सोबत,पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचा दौरा करून स्थानिक शिवसेना नेते, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून त्वरित पर्यावरण विभागाची पुढील बांधणी आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरणीय प्रश्न धसास लावण्यासाठी शिवसेना मुख्य नेते आणि युवा नेते खासदार महोदयांकडे प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करण्याचा मानस व शिवसेना नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे तानाजी घाग यांनी बोलून दाखविले.