हैडलाइन

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, या मागणी साठी मनसे ची वाशी रेल्वे स्थानका बाहेर स्वाक्षरी मोहीम, हजारोंच्या संख्येने स्वाक्षरी करून नागरिकांनी व्यक्त केला राग


ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा जो भ्रष्ट कारभार सुरू आहे त्याविरुद्ध देशभरात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. काल सुद्धा अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आंदोलन केलं. नवी मुंबईत आज सकाळी वाशी रेल्वे स्थानका बाहेर मनसेने स्वाक्षरी मोहीम राबवली होती. या मोहिमेला मोठ्या संख्येने नागरिकांनी, महिलांनी आणि विशेष करून तरुणांनी प्रतिसाद देऊन आपली स्वाक्षरी करून राग व्यक्त केला. मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वन, टू, थ्री, फोर... ज्ञानेश कुमार वोट चोर, या ज्ञानेश कुमार चे करायचं काय... खाली डोकं वर पाय, गद्दार ज्ञानेश...राजीनामा द्या अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच तिरंगा झेंडा फडकवत, मिरवत इंकलाब झिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा ही दिल्या. 


मनसेच्या कार्यकर्त्यांनी "गद्दार ज्ञानेश...राजीनामा द्या" अशा आशयाचे घातलेले टी शर्ट लक्ष वेधून घेत होते. आपली स्वाक्षरी करताना मोदी सरकार आणि ज्ञानेश कुमार यांना आता हटवण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांनी दिली. नवी मुंबईत स्वाक्षरी मोहीम प्रत्येक विभागात राबवून ही मोहीम अजून तीव्र करण्यात येईल अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी दिली. 


या स्वाक्षरी मोहिमेत मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहर अध्यक्ष निलेश बाणखेले, सविनय म्हात्रे, विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव नगरसेवक अभिजित देसाई, मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, रोजगार सेना शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, महिला सेना उप शहर अध्यक्ष दिपाली ढवूळ, यशोदा खेडसकर, मनसे विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, शाम ढमाले, योगेश शेटे, विकास पाटील, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, निखिल गावडे, रोहन पाटील, नितीन नाईक यांच्यासह मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 




Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...