हैडलाइन

राज्यपालांच्या हस्ते उपनगर पत्रकार एसोसिएशन च्या मानचिन्हाचे प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते उपनगर पत्रकार एसोसिएशन च्या मानचिन्हाचे प्रकाशन


मुंबईतील उपनगर पत्रकार असोसिएशनच्या मानचिन्ह आणि ओळ्खपत्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले आहे यावेळी उपनगर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष आनंद श्रीवास्तव,सचिव मनोज कुळकर्णी, खजिनदार सय्यद एजाज,आनंद पांडे,समीर करनुक ,प्रशांत बढे उपस्थित होते.


उपनगरातील पत्रकारांसाठी असलेली ही संस्था 2017 मधे स्थापन करण्यात आली होती .या संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले आहेत तसेच पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर,अडचणी सापडलेल्या पत्रकारांना आर्थिक मदत असे कार्यक्रम केले आहेत.


या संस्थेची अधिकृत ओळख असल्याने संस्थेचे मानचिन्ह असण्याची गरज पत्रकार सदस्यांनी  व्यक्त केली होती.त्यासाठी एक अधिकृत मानचिन्ह तयार करण्यात आलं त्याच प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं.यावेळी राज्यपालांनी सदस्यांच कौतुक करत राष्ट्रीय आणि सामाजिक जबाबदारी ओळखून पत्रकारिता करून जनतेची काम करावी अशी सदिच्छा व्यक्त केली


Most Popular News of this Week