लॅाक डाऊन कालावधीत डबेवाल्यांचा व्यवसाय संपुर्ण पणे बंद आहे.
कुटुंब चालवायचे आहे त्या साठी पैसे पाहीजे मग मिळेल ते काम करून डबेवाला पैसे कमवू पहातो आहे.
लॅाकडाऊन कालावधीत हॅाटेल व्यवसाय बंद आहे पण हॅाटेलवाले पार्सल ॲार्डर घेऊ शकतात. ही सवलत हॅाटेलवाल्यांना आहे. पण ही पार्सल ॲार्डर पोहचवायला मनुष्यबळाची गरज आहे. मग अशा वेळी काही ठिकाणी ही गरज डबेवाल्यांनी पुर्ण केली. काही हॅाटेल मालकांनी ठराविक डबेवाल्यांना डिलिव्हरी करण्याचे काम देण्यास सुरवात केली आहे.
सध्या डबे पोहचवायचा व्यवसाय बंद आहे मग काही तरी रोजगार करणे गरजेचे आहे जो पर्यंत डबे पोहचवायचा व्यवसाय पुर्ण पणे चालू होत नाही तो पर्तंय असेच काही तरी काम आर्थीक गरज पुर्ण करावी लागेल.