२७ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले ज्यात मुख्यालयातील ५,भुसावळ विभागातील ७, मुंबई विभागातील ५, पुणे विभागातील ४ आणि नागपूर व सोलापूर विभागातील प्रत्येकी ३ कर्मचारी यांचा समावेश होता.
एप्रिल-२०२१ ते मार्च-२०२२ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्यांनी ३५.३९ लाख प्रकरणे शोधून काढली आणि २१४.४१ कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१-२२ या आर्थिक वर्षातील सर्व क्षेत्रीय रेल्वेंमधील हा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे आणि रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे.
ज्या २७ तिकीट तपासणी कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
एक कोटीपेक्षा जास्त तिकीट तपासणीच्या उत्पन्नाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
श्री मोहम्मद सॅम्स, टीटीआय, मुंबई विभाग रु. १.२५ कोटी
श्री. जे. जे. दरबे, प्रमुख तिकीट परीक्षक, नागपूर विभाग रु. १.०७ कोटी
श्री अभिषेक सिन्हा, टीटीआय, मुंबई विभाग, रु. १.०५ कोटी
श्री धर्मेंद्र कुमार, टीटीआय, मुख्यालय, मुंबई रु. १.०५ कोटी
श्री के. के. पटेल, टीई, भुसावळ विभाग, रु. १.०३ कोटी
श्री सुनील नैनानी, टीटीआई, मुंबई विभाग, १.०३ कोटी
याशिवाय, २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न जमा करणाऱ्या इतर तिकीट तपासणी कर्मचार्यांचे योगदान देखील उल्लेखनीय आहे.
दोन तिकीट तपासणी कर्मचार्यांचा त्यांच्या कर्तव्याच्या कामगिरीबद्दल वेगळा दृष्टिकोन दाखवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला आहे:
श्री राजेंद्र काटकर, हेड ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक, पुणे विभाग, यांनी दि. ८.८.२०२१ रोजी ट्रेन क्रमांक 01040 मध्ये कर्तव्य बजावत असताना, २ वर्षाच्या मुलावर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) केले आणि त्याचे प्राण वाचवले.
श्री एस के दुबे, मुख्य तिकीट निरीक्षक, मुंबई विभाग, यांनी ट्रेन क्रमांक 12294 दुरांतो एक्स्प्रेसमध्ये तिकीट नसलेल्या लोकांचा समूह शोधून काढला आणि त्यांच्याकडून रु. १७,४३५/- दंड वसूल केला.
दि. ५.५.२०२२ रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या सर्व २७ कर्मचाऱ्यांचा श्री मणिजीत सिंग, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुश्री इती पांडे, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पीएस), श्री दीपक शर्मा, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (आर आणि टीसी) आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि विनातिकीट तसेच अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या सर्व विभागांमधील उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करते.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करत आहे.